Type Here to Get Search Results !

देसाई येथे जिल्हास्तरीय भव्य अभंग गायन, पखवाज, तबला वादन स्पर्धा संपन्न


ठाणे रायगडचा महा अभंग गायक सृष्टी पाटणकर, तबला वादन अंश पाटील, पखवाज वादन सुयश म्हात्रे  विजेता मानकरी ठरले


ठाणे दि.२१, ( विनोद वास्कर ) :  देसाई गाव येथे अभंग गायन, पखवाज सोलो वादन आणि तबला वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  आजमितीला मैदानी खेळांच्या स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होत असताना ठाणे तालुक्यातील देसाई गाव येथे एक अनोखी स्पर्धा पार पडली आहे.


श्री गुरुस्मरण महोत्सव २०२४ चे औचित्य साधून ओंकार नादब्रम्ह,संगीत कला केंद्र प्रतिष्ठान देसाई गाव,ठाणे महाराष्ट्र कला मंच  यांच्या वतीने गुरुवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी जिल्हा स्तरीय भव्य अंभग गायन, पखवाज सोलो वादन व तबला स्पर्धेचे आयोजन देसाई वेताळ पाडा ता. जि. ठाणे येथे करण्यात आले होते.  आयोजक: ओम कार नाद ब्रम्ह संगीत कला प्रतिष्ठान देसाई गाव ता. जि ठाणे, (ठाणे महाराष्ट्र कला मंच) संस्थापक: ह. भ. प.निवृत्ती मदन मुंढे देसाई गाव यांनी आयोजन केले होते.


उद्घाटन सोहळा बाळाराम अर्जुन म्हात्रे अध्यक्ष देसाई गाव, मा.नगरसेवक बाबाजी पाटील,विष्णू कोटकर विभागप्रमुख, गोपीनाथ पाटील समाजसेवक, या सर्वांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी गुरुवर्य तळमनी पं.श्री प्रतापराज पाटील ( खारघर ),यशवंत भोईर (माऊली) देवीचा पाडा, माजी नगरसेवक बाबाजी पाटील,विष्णू शेठ ठाकूर, विष्णू शेठ भोईर, किशोर पाटील डी. जी, किशोर म्हात्रे शाखाप्रमुख, डॉ.भानुदास मुंढे,डॉ.शिल्पा मुंढे, लोक शाहीर जयवंत भोईर, शत्रुघ्न पाटील वस्ताद, दिपेश पाटील,सखाराम पाटील, नारायण बुवा, अभिमन्यू बुवा,  ह.भ.प.जितेंद्र महाराज पाटील आमने, ह.भ.प. हनुमान महाराज कोळे, अक्षराज पत्रकार विनोद वास्कर, ऍड विकास म्हात्रे नवी मुंबई, आदि  ग्रामस्थ उपस्थित होते. सकाळी ९  वाजण्याच्या सुमारास या स्पर्धेला सुरुवात झाली आणि रात्री १० वाजता ही स्पर्धा संपन्न झाली. 
 

पखवाज वादन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सुयश विकास म्हात्रे ( नवी मुंबई ),द्वितीय पारितोषिक रोहित म्हात्रे ( ओवे पनवेल, क ), तृतीय पारितोषिक
 मनन भालचंद्र पाटील ( तलोजे), यांनी पटकावले आहे. 

 

अभंग गायन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक सृष्टी  वैभव पाटणकर ( डोंबिवली ), द्वितीय पारितोषिक तृप्ती अविनाश पाटील (पनवेल) , तृतीय पारितोषिक अथर्व कपिल फौजदार (कौसा, ठाणे ), यांनी पटकावले आहे. 

 

तबला वादन स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक अंश संतोष पाटील ( रोहिंजन ), द्वितीय पारितोषिक आयान कोळी. ( दिवाळे), तुतिय पारितोषिक ज्ञानेश्वरी राजन कालन ( अंबरनाथ ) यांनी  पटकावले आहे.


जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये पखवाज सोलो वादन स्पर्धेसाठी २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. अभंग गायन स्पर्धेसाठी २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. तबला वादन स्पर्धेसाठी २०० स्पर्धकांनी भाग होता. एकूण ६०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यातून एकूण ३६ स्पर्धकांची निवड झाली होती. त्यापैकी फायनल साठी टॉप १२ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यातून ९ स्पर्धक विजेते ठरले.
 

या सर्व आयोजकांनी  प्रतिष्ठान प्रमुख निवृत्ती मुंढे,गोपीनाथ पाटील, हरेश भोईर,कपिल फौजदार,नरेश भोईर,दिनेश फुलोरे, रंगनाथ महाराज मुंढे, प्रसाद मुंढे, तकदिर पाटील, अक्षय म्हात्रे, जगन्नाथ मुंढे, रमेश म्हात्रे, सप्तदीप पाटील,महेश म्हात्रे, बंटी पाटील, राम पाटील,पिंटू भोईर, निलेश पाटील, धैर्य मुंढे,निनाद पावशे,योगेश म्हात्रे,रोहित पाटील,प्रशांत म्हात्रे,केतन म्हात्रे, या सर्व आयोजकांनी कार्यक्रम  यशस्वी रित्या पार पडण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies