Type Here to Get Search Results !

जागतिक जल दिननिमित्त विद्यार्थ्यांनीकडून जलदिंडी; जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना 'शांततेसाठी पाणी'

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :   या वर्षीची जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना 'शांततेसाठी पाणी' ही असून या पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचा पाण्यावर समान हक्क आहे. बचत पाण्याची, गरज काळाची; पाणी अडवा, पाणी जिरवा; स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर इत्यादि घोषवाक्यांनी टिळकनगर परिसर दुमदुमून गेला. पाण्याचे संवर्धन, संरक्षण तसेच नैसर्गिक जलस्त्रोताचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व देखील कटिबद्ध राहुया अशी जलप्रतीक्षा टिळकनगर विद्यामंदिर मधील  विद्यार्थ्यांनी घेतली.


  टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली, श्री लक्ष्मी नारायण संस्था, ऊर्जा फौंडेशन आणि विवेकानंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिनाच्या निमित्ताने जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. टिळकनगर विद्यामंदिरच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे  विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच वरील सर्व संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

   श्री लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाचे मेधा वैद्य, उज्वला केतकर, आदित्य कदम, समीक्षा चव्हाण, रूपाली शाईवाले, ऊर्जा फौंडेशनच्या स्नेहल दीक्षित, मेधा गोखले, प्रिया राणे, गीता शेट्टीगर तसेच विवेकानंद सेवा मंडळचे सचिव अनिल मोकल आणि सारिका परब आदी  कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमासाठी टिळकनगर विद्यामंदिरचे पर्यवेक्षक  चौधरी  आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विदुला साठे यांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य लाभले.

जलदिंडी मध्ये परंपरागत पद्धतीने पालखी, अब्दागिरी, झांज पथक, झेंडे पथक (सौजन्य: टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, डोंबिवली) तसेच पारंपरिक वेशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि पर्यावरण विषयी संवेदनशील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. पाणी  बचतीचे महत्व विषद करणारे फलक अनेकांच्या हातात झळकत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies