ठाणे, दिवा ता 22 मार्च ( प्रतिनिधी : संतोष पडवळ ) : मध्य रेल्वेच्या दिवा जंक्शन रेल्वे स्थानकातील फलाट क्र ५/६ वरून दिवा ते वसई, पनवेल, पेन, रोहा कडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वे गाड्या सुटतात. सदर फलाटावर प्रवास्यांसाठी तयार करण्यात आलेले सुलभ सौचालय पूर्ण होऊन ऐक वर्ष होत आले तरीही सुरु झालेल नाही. परिणामी सदर ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवास्यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत खासकरून महिला व लहानमुलांना फलाट क्र ऐक वर जावे लागत आहे. त्यातच रेल्वे प्रवास्यांना रेल्वे फाटक बंद केल्याने व फलाट १/२ वर सरकता जिना झाल्याने अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. तयार असलेले सुलभ शौचालय उदघाटनाच्या प्रतीक्षेत अडकले आहे.
प्रवाश्यांना लघुशंकेसाठी पटरीवर उतरून उभ्या असलेल्या गाडीचा आसरा घ्यावा लागत आहे. परिणामी आपला जीव धोक्यात घालून फलाटावरून पटरीवर उतरावे लागत आहे तर लहान मुलं व महिलांना अनेक अडचणीनींचा सामना करावा लागत असुन जेष्ठ नागरिक असलेल्या प्रवाश्यांना लघुशंकेसाठी पटरीवर उतरावे लागत असल्याने रेल्वे आपघात होऊन अनर्थ होऊ शकतो प्रकरणी प्रवाश्यांनी रेल्वे प्रशासना विरोधात प्रचंड रोष व्यक्त केला आहे.