Type Here to Get Search Results !

इक्रा हायस्कूल उरण येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न.उरण दि १८(विठ्ठल ममताबादे ) भारतीय निवडणूक आयोगाच्या स्वीप उपक्रमा अंतर्गत नुकताच उरण तालुक्यातील इक्रा हायस्कूल मध्ये मतदान जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला. मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे.

निवडणूक कोणतीही असो या निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी. कोणत्याही अमिषाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा. "मेरा व्होट मेरी पहचान" अशी ओळख  लोकशाहीच्या  सर्वात मोठ्या सणात म्हणजे निवडणुकीत मतदाराने करायला हवी अशा प्रकारची  मतदान करण्या बाबत जनजागृती उपस्थित पालक वर्गात करण्यात आली. 

या वेळेस इक्रा हायस्कूलचे १६० हून अधिक पालक उपस्थित होते. या उपस्थित पालक वर्गाला मतदान का करावे ? या बाबत  उरण तालुका गटशिक्षणाधिकारी प्रियांका म्हात्रे  तसेच मार्गदर्शक पदवीधर शिक्षक मच्छिंद्रनाथ म्हात्रे व किशोर पाटील यांनी मार्गदर्शन केले. 

सदर कार्यक्रमास नवीन शेवे केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.पवार सर,इक्रा हायस्कूलच्या प्राचार्य फरहत तुंगेकर,सहाय्यक शिक्षिका अंशू सहतीया,मनिषा मुसळे,पालक प्रतिनिधी तजीन सोंडे,सुंबुळ तुंगेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies