Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहर पोलीस अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान, नूतन इमारतीचा हस्तांतर सोहळा पोलीस आयुक्तांच्या हस्ते संपन्न

ठाणे  ( विनोद वास्कर )  : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे शहर पोलीस अधिकाऱ्यांसाठी निवास स्थान नूतन इमारतीचा हस्तांतर व उदघाटन  सोहळा  १६ मार्च २०२४ रोजी दुपारी १२ ते १ वाजताच्या दरम्यान पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे  यांच्या हस्ते सम्पन्न झाला . 


यावेळी ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे , ज्ञानेश्वर चव्हाण,सह पोलीस आयुक्त, ठाणे शहर , संजय जाधव,अपर पोलीस आयुक्त, प्रशासन,सुभाष बुरसे पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ ठाणे , उत्तम कोळेकर, सहा. पोलीस आयुक्त कळवा,  संदिपान शिंदे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिळ डायघर पोलीस स्टेशन, माजी.नगरसेवक बाबाजी पाटील, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साहिल पाटील, शिळगावचे पोलीस पाटील संतोष भोईर, मनसे शिळ देसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील, समाजसेवक  भोलेनाथ नगर  बाबुराव मुंढे, आणि पंचक्रोशितील नागरिक उपस्थित होते.


मौजे खिडकळी येथील सर्व्हे क्र.१११/१ व ११२/अ/२ हा भूखंड पोलीस ठाणे साठी आरक्षित होता. दि. २३/०६/२०१६ रोजी पोलीस आयुक्त ठाणे तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्त व बिल्डर किशोर पाटील व प्रवीण पाटील यांच्यामध्ये सदर ठिकाणी पोलीस स्टेशन ऐवजी पोलिसांसाठी विना मोबदला घरे बांधून देण्या संदर्भाने करारानामा करण्यात आलेला आहे. 


सदरचा करारनामा Accommodation Reservation policy च्या माध्यमातून इमारत सी-१ ही विकास प्रवीण पाटील यांनी बांधलेली आहे. सदर इमारत ही स्टील्ट  + १ ते ५ व ६ पार्ट अशी असून सदर बांधकाम १३४७.४३चौ.मी.आहे.सदर ईमारतीमध्ये २ बी. एच. के. चे २१ फलाट असुन प्रत्येक फलाट चा कारपेट एरिया  ५७० आहे. इमारतीचे आरक्षित भूखंड हा १४३०.२७ चौ. मी.आहे. 


सदरची इमारत पोलीस विभागाकडे दि.१२/०३/२०२४ रोजी ठाणे महानगरपालिकेकडून हस्तांतरित करण्यात आलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |