कल्याण : छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विणाताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभाग क्र. ३८, रामबाग सिंधीगेट शाखा यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन म्हसकर हॉस्पिटल जवळ करण्यात आले होते.
महिलांनी आरती करुन पुजन केले, त्यानंतर उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक श्रेयस समेळ, संजोग गायकवाड, नरेंद्र नागरे, वेणु शेट्टी, अभय कामल्य, सुजित रोकडे, दिपक दुसाने, संजय दिवटे, महेश भमोडे, दिपक तांबे, अभिषेक गवारे, मनोहर व्यवहारे, हसन शेख, सुनिल वाघमारे, दिपक शिंपी, महेंद्र चौधरी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर दिवटे, प्रकाश गव्हाणकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, महिला आघाडी, युवा सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी नगरसेवक गणेश जाधव यांच्या संकल्पनेने सुंदर असे छत्रपती शिवाजी महाराज यांचे रेखाचित्र गड बनविला होता.