Type Here to Get Search Results !

स्थानिक समाज व भूमिपुत्र कल्याण लोकसभा लढवण्यासाठी सांगत असतील तर गोविंद भगत तयार, खर्चाचा भार समाजाने उचलावा



ठाणे / दिवा ( विनोद वास्कर ) : स्थानिक समाज व भूमिपुत्र कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सांगत असतील तर गोविंद भगत लढवणार, खर्चाचा भार समाज उचलत असेल तर मी लढण्यासाठी तयार आहे. असे गोविंद भगत म्हणाले आहेत.


गेली ५० ते ५५ वर्षे गोविंद भगत ही व्यक्ती बहुजन आगरी-कोळी, कुणबी, दलित आदिवासी, ओबीसी इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाला घेऊन लढत आहेत. रेल्वेत कामगार हितासाठी लढले. एका दलित कामगाराच्या प्रमोशनसाठी आपली नोकरी सोडली. मध्ये रेल्वेवर म्हातार्डी व कोकण रेल्वेवर दातीवली, आगासन, नारीवली, निघु-बामाली स्टेशन व्हावीत म्हणुन १९९२ साली ५ तास रेलरोको आंदोलन केले होते. त्यात कोकण भुमिपुत्रांंच्या जिव्हाळ्याच्या मागण्या होत्या. १९९२ साली दिवा ते डोंबिवली व कल्याण साठी मानपाडा मार्गे एसटी सेवा सुरु केली होती. २००० साली पालिकेतुन गावे वगळून ६३ गावांची स्वतंत्र मानपाडा तालुका पंचायत समिती स्थापन करण्यात आली होती, राजकीय विरोधामुळे अडचण निर्माण करण्यात आली.  टोरंट विरोधात भिवंडी, कळवा-मुंब्रा ,दिवा शिळ, देसई, दहिसर विभागात तीव्र आंदोलन करत असताना अनेक मातब्बर नेत्यांनी धोका दिलेला असताना आजही आंदोलन सुरू आहे. कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर अंबरनाथ याठिकाणी सुपरिचित आहे. त्यामुळे स्थानिक समाज व भुमिपुत्रांच्या एकदम जवळचा उमेदवार म्हणुन सर्वांची योग्य पसंती ठरू शकतो. स्थानिक समाज व भुमिपुत्रांंनी जरुर विचार करावा. तसेच वसंत पाटील लढत असतील तर त्यांनाही मदत केली जाईल असे गोविंद भगत यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies