Type Here to Get Search Results !

वाईन शॉपममधील दारू व वाईन चोरी करून विक्री करणा-या नोकरासह साथिदार अटकेत

 


डोंबिवली :  वाईन शॉपममधील वेगवेगळया कंपनीच्या व किमंतीच्या दारूच्या सिलबंद बाटल्या चोरी करून ढाबा आणि इतर ठिकाणी विक्री करणाऱ्या नोकरासह चौघांना कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने बेड्या ठोकून अटक केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल प्रकाश कुंदल, रा. बॅरेक नं. १९३४, रूम नं. १३, ओ.टी. सेक्शन, उल्हासनगर-५ ), सुरेश प्रितम पाचरने (२४, रा. विठलनगर झोपडपटट्टी, गणपती मदिंराचे मागे, उल्हासनगर-०५, नरेश राघो भोईर ( ३९, रा. जिजाउ बंगल्याचे बाजुला, नरेश किराणा दुकानाचेवरती, नेवाळी गाव, ता. अंबरनाथ आणि सागर श्रावण पाटील (२४, जय भोलेनाथ ढाबा, राह. मांगरूळ गाव, ता. अंबरनाथ ) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.


सुनील यास पोलीस पथकाने सापळा रचुन उल्हासनगर येथुन ताब्यात घेतले.वेगवेगळया कंपनीच्या व किमंतीच्या दारूच्या सिलबंद बाटल्या आपसात संगनमत करून ढाबा आणि इतर ठिकाणी विक्री करत असल्याचे तपासात समोर आले.या चोरीत सुनील यांसह तिघांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी चौघांकडून दारूच्या सिलबंद बाटल्या व रोख रक्कम असा एकुण २१,६५५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी व हस्तगत केलेला मुदद्देमाल पुढील तपासाकरता कोळसेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा, ठाणे शहर )निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पो.हवा. दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, विलास कड्डु, अनुप कामत, गोरखनाथ पोटे, पो.ना. महाजन, सचिन वानखेडे, पो.शि. गोरख शेकड, गुरूनाथ जरग, जाधव, म.पो.हवा. ज्योत्सना कुंभारे, मेघा जाने, चा.पो.हवा. अमोल बोरकर ( गुन्हे शाखा ) यांनी बजावली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies