Type Here to Get Search Results !

कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा शहरात शनिवारी महायुतीचा मेळावा सम्पन्न


दिवा सीएसटी फास्ट लोकल, एसी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे 

 दिवा : - कल्याण लोकसभा मतदारसंघातील दिवा शहरात शनिवारी महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित राहून महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 


यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले कि, देशाचं नेतृत्त्व निवडण्यासाठी ही निवडणूक आहे. ५०० वर्षांची प्रतीक्षा संपवून राममंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं. प्रत्येक घरात गॅस, शौचालय पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदींजींनी केलं. देशाची अर्थव्यवस्था शेवटच्या पाचातून पहिल्या पाचात आणण्याचं काम मोदींजींनी केलं. रेल्वेच्या सुविधा पुरविण्यासह दिव्यासारख्या स्टेशनचा कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारने केलं, असं याप्रसंगी ठामपणे सांगितलं. गेल्या १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं झाली. रिझर्वेशन काऊंटर, पाचवी सहावी लाईन, दिव्यात फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणे अशी कामे मागच्या १० वर्षात केल्याचं सांगत दिव्यातले १० वर्षांपूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे. १० वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाले. दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबवण्यासह दिवा सीएसटी फास्ट लोकल, एसी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहे. तसेच दिव्यातलं डम्पिंग बाहेर नेण्याचा शब्द पूर्ण केला असून मुंब्रा वाय जंक्शन पूल, ऐरोली काटई मार्ग, मुंब्रा उड्डाणपूल यामुळे प्रवास देखील वेगवान झाल्याचं यावेळी सांगितलं. ही मोठ्या प्रमाणात झालेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. प्रत्येकाला पुन्हा एकदा आदरणीय नरेंद्र मोदींजींनाच पंतप्रधान करायचं असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले.


याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) मा. ना. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, शिवसेनेचे राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मढवी, ब्रह्माशेठ पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आरपीआयचे ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, साहेबराव सुरवाडे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies