Type Here to Get Search Results !

शिळ, मुंब्रा वाय जंक्शन मार्गावर खाजगी बसला आग


ठाणे / मुंब्रा ( विनोद वास्कर ) : २ एप्रिल २०२४ रोजी पहाटे ०५:५२  वाचण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार घटनेची माहिती देणारे मुंबई आपत्ती व्यवस्थापन कक्ष तक्रारदार यांनी आज दिनांक ०२/०४/२०२४ रोजी  काळसेकर हॉस्पिटल जवळ, वाय जंक्शन, शीळ रोड, कौसा, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी वाय जंक्शन ब्रीज खाली पार्क केलेल्या टाटा कंपनीची बस क्रमांक  एम. एच. ४३एच २५८८(MH 43 H 2588 मालक - श्री. सलीम खान.) या बसला आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत झाली नाही.


सदर पार्क केलेली बस खाजगी असून बसमध्ये कोणीही प्रवासी नव्हते.सदर वाहनाच्या चालक केबिन व पुढील बाजूस आग लागल्याने वाहनाच्या पुढील बाजूचे नुकसान झाले आहे.


सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने ०६:१५ वाजण्याच्या सुमारास पुर्णपणे विझविण्यात आली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे. असे आपत्यकालीन व्यवस्थापकाकडून कळविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies