संघाची नवीन २०२४-२५ कार्यकारिणी जाहीर
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवली पत्रकार संघ २०२४-२५ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी शंकर जाधव, उपाध्यक्षपदी महावीर बडाला, सचिवपदी प्रशांत जोशी आणि खजिनदारपदी वासुदेवन मेनन यांची एकमताने नियुक्ती करण्यात आली. मावळते पदाधिकारी प्रशांत जोशी व सोनल सावंत-परब यांनी नवनियुक्त अध्यक्ष शंकर जाधव यांच्या हाती संघाची सूत्रे दिली.
यावेळी शंकर जाधव यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यावर आपल्या पुढील कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. नवीन कार्यकारणीत पत्रकारांसाठी नवनवीन उपक्रम राबविणार असून त्यासाठी पत्रकार संघातील पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याची विनंती केली. उपाध्यक्ष बडाला सचिव जोशी यांनीही संघाच्या माध्यमातून नवीन उपक्रम कशा पध्द्तीने घेता येतील याविषयी आपली मते मांडली.
दरम्यान जेष्ठ छायाचित्रकार जोशी यांच्यासह इतर सदस्यांनी कशा पध्दतीने पत्रकारांसाठी काम करता येईल याबद्दल आपापली मते मांडली. पत्रकार संघाच्या माध्यमातून शहरातील समस्या सोडवण्यासाठी काही करता येईल का आदी विषयांवर शंकर जाधव यांनी प्रकाश टाकला.