डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेना ( शिंदे गट ) कडून विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
आता ही उत्सुकता संपली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर केले आहे. 2009 साली मनसेकडून वैशाली दरेकर यांना 1 लाख 9 हजार मते मिळाली होती. त्यांच्यासमोर शिवसेनेकडून आनंद परांजपे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वसंत डावखरे उभे होतें.