दिवा : शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटप्रमुखांचा मेळावा प्रमुख मार्गदर्शक कल्याण लोकसभा जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
त्यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याचा निर्धार गटप्रमुखांनी केला. यावेळी कल्याण लोकसभेला महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकण्यासाठी पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदार पर्यंत पोहचण्याचे आदेश देण्यात आले. सदर मेळाव्यासाठी उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील, युवासेना जिल्हा युवा अधिकारी प्रतीक पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
मेळाव्याचे आयोजन शहरप्रमुख सचिन पाटील , उपशहर प्रमुख तेजस पोरजी, शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी केले असून ज्येष्ठ शिवसैनिक राम पाटील, माजी नगरसेविका अंकिता पाटील, विधानसभा संघटीका योगिता नाईक, शहर संघटक रोहिदास मुंडे, शहर संघटीका ज्योती पाटील, प्रियांका सावंत, स्मिता जाधव ,उमेश राठोड आदी पदधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.