डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली विधानसभा मतदार संघात मतदानाचा आढावा घेतला. सोमवार २० मी रोजी लोकसभा मतदान संघाच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत सकाळपासून मतदान केंद्राबाहेर गर्दी झाली होती. दुपारच्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीत मतदानाचा आढावा घेतला.
युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची डोंबिवलीत भेट घेतली. तसेच पुढे ह प्रभाग क्षेत्र कार्यालयाजवळील मतदान केंद्राबाहेर मुख्यमंत्री शिंदे आले असता शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा )म्हात्रे , संदीप सामंत , मनोज वैद्य, अवि मानकर यांनी भेट घेतली. तर दिनद्याळ रोडवर माजी नगसेवक शैलेश धात्रक व माजी नगरसेविका मनीषा धात्रक यांनीहि मुख्यमंत्रीशिंदे यांची भेट घेतली.