Type Here to Get Search Results !

आरटीईच्या प्रवेशाचे अर्ज भरण्यासाठी १० मे २०२४ पर्यंत मुदतवाढ




ठाणे : आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दि. १६.०४.२०२४ ते ३०.०४.२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. परंतु या प्रक्रियेत अर्ज भरण्यासाठी दि. १०.०५.२०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी दि. ०२/०५/२०२४ पर्यंत एकूण ४ हजार ४५० अर्जांची नोंदणी पूर्ण (CONFIRM) झालेली आहे व १४ हजार ९६५ अर्जांची नोंदणी अपूर्ण (NOT CONFIRM) असल्याचे दिसून येत आहे. तरी नोंदणी अपूर्ण असलेले बालकांचे अर्ज (NOT CONFIRM) दि. १०/०५/२०२४ पूर्वी पूर्ण (CONFIRM) करून घ्यावेत. तसेच या प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या (वंचित गट– SC/ST/NT/VJ/OBC/SBC , दुर्बल गट–१ लाखापेक्षा कमी उत्पन्न, दिव्यांग– बालकांचे ४०% अपंगत्व) जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रक्रियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा.

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण २ हजार ६२० पात्र शाळा असून एकूण ३६ हजार ८६८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या वेबसाईटवर अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या प्रवेश प्रक्रियेबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी सर्व पंचायत समिती व महानगर पालिका स्तरावर मदतकेंद्र सुरू करण्यात आल्या आहेत. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centre), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वरील वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies