उरण दि २८ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना अल्प दरात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे या उद्देशाने प्रसिद्ध उद्योजक जे.एम.म्हात्रे यांनी वेश्वी या छोट्याशा गावी सुरू केलेल्या जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्था संचलित पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा २०२३-२४ वर्षाचा एकूण निकाल सलग सहाव्या वर्षीही १०० % एवढा लागला असून कुमारी सृष्टी किरण पाटील हिने ९६ % गुण मिळवून उरण तालुक्यातून तसेच शाळेतून प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
तसेच कुमार हर्ष केशव ठाकूर ८६.६० % गुण मिळवून द्वितीय तर कुमार विघ्नेश अजित पाटील ८६ टक्के गुण मिळवून शाळेतून तृतीय क्रमांक पटकावला आहे.शाळेच्या एकूण निकालामध्ये ६५ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर ४४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे.एम.म्हात्रे ,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रितम शेठ म्हात्रे साहेब,संस्थेचे सचिव जे.के मढवी ,शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रितम टकले व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका तृप्ती म्हात्रे यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.