Type Here to Get Search Results !

कल्याणकर जागरुक नागरिक संघटनेनी केली वारकरी मेळाव्यात मतदान जनजागृती


डोंबिवली ( शंकर जाधव ) : कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढावी याकरीता महानगरपालिका आपल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांमार्फत वेगवेगळ्या अभिनव उपक्रमांचे आयोजन करीत आहे. महापालिकेचे स्वीप नोडल अधिकारी व अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांनी देखील कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील नागरिकांना मोठया संख्येने मतदान करणेबाबत आवाहन केले आहे.

कल्याण पूर्व परिसरातही महापालिकेचे शिक्षणाधिकारी व कल्याण पूर्व स्वीप नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्यामार्फत मतदान जनजागृतीसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यास अनुसरुन कल्याण पूर्व परिसरातील कशिष इंटरनॅशनल हॉटेल येथे संपन्न झालेल्या वारकरी मेळावा व हरिनाम संकिर्तन कार्यक्रमात वारकरी समाज आणि कल्याणकर जागरुक नागरिक समितीचे पदाधिकारी, सदस्य यांनी संयुक्तरित्या मतदान जनजागृती अभियान राबवित आजूबाजूच्या नागरिकांना व उपस्थितांना 20 मे रोजी मतदान करणेबाबत आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies