Type Here to Get Search Results !

अत्यावश्यक सेवेत असलेले अधिकारी/कर्मचारी व कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची व्यवस्था


ठाणे दि. 09 : अत्यावश्यक सेवेत असलेल्या, 25- ठाणे लोकसभा मतदार संघातील कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

नोंदणीकृत मतदार, पोलीस दलातील अधिकारी/कर्मचारी,अग्निशमन दल, वैदयकीय सेवेतील कर्मचारी यांच्यापैकी ज्यांनी विहित मुदतीत टपाली मतपत्रिकेसाठी नमुना 12 /12 ड व EDC कार्यप्रमाण पत्राकरिता नमुना 12 अ मध्ये अर्ज केला होता व जे कर्मचारी तपासणीअंती पात्र ठरले आहेत, अशा 12 अ च्या पात्र कर्मचाऱ्यांना EDC प्रमाणपत्र वितरण करणे, तसेच नमुना 12 अ/ नमुना 12 ड भरलेल्या आणि पात्र ठरलेल्या मतदारांना टपाली मतपत्रिका वितरीत करुन, टपाली मतपत्रिकांच्या मतदानाकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, 25- ठाणे लोकसभा मतदारसंघ यांच्या स्तरावर टपाली मतदानाची सुविधा “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे (पश्चिम) 400601 येथे दि. 14 मे, दि. 15 मे व दि.16 मे 2024 या दिवशी सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तर पोलीस आयुक्त कार्यालयातील पोलीस कर्मचारी व अत्यावश्यक सेवेतील वाहक चालक ज्यांनी 12 अ नमुना भरला आहे त्यांना दि. 17 मे, 18 मे व 19 मे 2024 या दिवशी टपाली मतदानाची सुविधा “प्रशिक्षण केंद्र,जिल्हा विकास उद्योजक केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे (पश्चिम) 400601 येथे सकाळी 9 ते सायं. 5 वाजेपर्यत उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

तरी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त झालेले अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/कर्मचारी यांनी आपले मत नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies