Type Here to Get Search Results !

सुप्रसिध्द साहित्यिक श्री.नवनाथ ठाकुर हे राज्यस्तरीय 'साहित्य दर्पण' पुरस्काराने सन्मानित.



ठाणे  ( विनोद वास्कर  ) : आज ०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयित्री बहिणाबाई साहित्य परिषद,कल्याण- डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय "साहित्य दर्पण " हा पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी, निवेदक, कलाकार, गीतकार तसेच आगरी समाजातील लग्नामधील 'धवलारीन...एक आगरी पुरोहित!' या पुस्तकाचे लेखक नवनाथ ठाकुर यांना उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कल्याण येथील ॲचिवर्स महाविद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जनार्दन ओक सर, महाराष्ट्र साहित्य परिषदचे अध्यक्ष विष्णू पाटील, बृ.मनपा माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी मा.भानुदास बोराळेसर, बृ.मनपा शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मा.डॉ.आनंदराव सुर्यवंशी, मा.श्यामसुंदर पांडे -अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य परिषद कल्याण, कल्याण-डोंबिवली म.न.पाचे शिक्षणाधिकारी मा.विजय सरकटे तसेच साहित्यिक,व्याख्याचे,समुपदेशक मा.अविनाश सोनवणे सर आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनाथ एकनाथ ठाकुर हे सुप्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक तसेच अभ्यासु व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आत्तापर्यंत २००० हून अधिक कविता, २०० हून अधिक चारोळ्या, प्रवासवर्णने, गावांतील ऐतिहासिक वर्णन, गावची 'साथ', देवी (बाया )पोवणे, कुलदैवतविधी बद्दल माहिती, लग्न कार्यातील विकृत हळदी-समारंभ यांवर लघू लेखांतून शाब्दिक प्रहारही केलेला आहे. लेखक नवनाथ ठाकुर यांनी विविध धार्मिक ग्रंथांचा सखोल अभ्यासही केला आहे. गीता, रामायण, उपनिषदे तसेच विविध महान चरित्रांचाही अभ्यास केला आहे. त्यांचा अध्यात्मिक प्रवास यशस्वीपणे सुरू आहे. जीवनाकडे विधायक दृष्टिकोन ठेवून बघणे. हा त्यांचा पायंंडा आहे. २०१९ मध्ये नवनाथ ठाकुर यांना भयंकर अर्धांगवायूचा झटका आला होता. अशा भयंकर आजारावर मात करून त्यांनी त्यांचे लेखन चालू ठेवले. लेखक नवनाथ एकनाथ ठाकुर हे 'अनुकंपा 'आधारावर वडिलांच्या जागी जानेवारी २००१ पासून मध्यरेल्वे माटुंगा वर्कशाॕपमध्ये कार्यरत आहेत.

लेखक नवनाथ ठाकुर हे विविध पुरस्कारांनी पुरस्कृत 
१) राष्ट्रीय कलम गौरव सन्मान-२०२० (राजस्थान),२) लोकप्रिय कवी सन्मान-२०२०,३) VOICE OF HEART' हा BEST WRITER AWARD-2020- जयपूर, ४) श्री गणेश रत्न पुरस्कार-२०२१(पूणे),५) अष्टविनायक पुरस्कार-२०२१,६) VOICE OF HEART-2021- (राजस्थान), ७) दिवाळी काव्यरंग षटकारवीर-२०२१ (रत्नागिरी), ८) साहित्य गौरव पुरस्कार-२०२१-पुणे,९) शब्द श्री साहित्य सन्मान
-२०२२-जयपूर (राजस्थान),१०) साहित्य श्री पुरस्कार-२०२२-पुणे,
११) विशेष सन्मान सोहळा-२०२२-पुणे,१२) प्रोत्साहन पुरस्कार-सरस्वती मंदिर पडलेगांव माजी शिक्षकवृंदांकडून'१३) शब्द रत्न पुरस्कार'-धुळे,'१४) पी.सावळाराम राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार' .१५) 'एफ के न्युज' हिन्दी चॕनेलवर तीन वेळा मुलाखत., १६) आगरी साहित्य शिरोमणी पुरस्कार-२०२३ (अलिबाग)
१७) साहित्यरत्न पुरस्कार-२०२३ (कल्याण), १८) अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कल्याण-डोंबिवली महानगर -अध्यक्ष म्हणून कार्यरत, १९) गणेश वत्सल पुरस्कार -काव्य निनाद साहित्य मंच-पुणे -२०२३, २०) साहित्य भूषण पुरस्कार-२०२४-नवी मुंबई, २१) 'लक्ष' Youtube channel ने मुलाखत घेतली., २२)साहित्य दर्पण पुरस्कार-कल्याण २०२४

'नांगर खांद्यावं घेऊनशी मी चाललो शेतावं.....'हे आगरी शेतकरी गीत व 'दिंडी चालली दिंडी चालली' हे गीत रेकाॕर्डिंग. 'कधि संपून जाईल?' कोरोना काळातील एका गीतामध्ये सह परिवार कलाकार म्हणून सहभाग.

धवलारीन....एक आगरी पुरोहित! ह्या पुस्तिकेचे लेखक नवनाथ एकनाथ ठाकुर यांनी सदर पुस्तिकेचे लिखाण करून ,आगरी,कोळी समाजातून, लग्नसमारंभातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या धवलगीतांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कृतीने प्रयत्न केले आहेत.

नवनाथ एकनाथ ठाकुर लिखित 'धवलारिन....एक आगरी पुरोहित!' या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. सदर पुस्तकाच्या काही प्रति ह्या दोन काॕलेज [म्हात्रे कॉलेज-बदलापूर व सर्वोदय कॉलेज-निळजे (डोंबिवली)] व दोन खाजगी ग्रंथालय [ठाणे ग्रंथालय व महानगरपालिका आॕफिस कल्याण] मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्या साहित्याची विविध वर्तमान पत्रकांनीही नोंद घेतली. तसेच त्यांचा 'काव्य इंद्रधनु' नावाचा प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशीत झालेला आहे. ज्यांत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध १० कवी-कवयित्रीच्या निवडक कविता प्रकाशीत केलेल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies