Type Here to Get Search Results !

गुजरातच्या सत्तेत आल्यास ५०० रुपयात गॅस सिलेंडर देण्याचा काँग्रेसच्या ८ मोठ्या घोषणा..



मुंबई : ( प्रतिनिधी अवधुत सावंत ) देशाचे लक्ष लागून असलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी एकूण दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर रोजी होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. तसेच, अंतिम निकाल ८ डिसेंबर रोजी जाहीर होणार असून याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचीही मतमोजणी जाहीर होणार आहे. त्यानंतर, आता राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गुजरातमध्ये प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. मात्र, यंदा केजरीवालांच्या आप पक्षचीही एंट्री होत आहे.


'आम आदमी पक्ष' ही गुजरातच्या मैदानात उतरल्यामुळे यंदा तिरंगी लढत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, भाजपकडून सत्ता राखण्यासाठी तर काँग्रेसकडून सत्ता मिळवण्यासाठी जोराचे प्रयत्न सुरू आहेत. गुजरातच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोठी घोषणा केली आहे. खर्गे यांनी गुजरातमधील जनतेसाठीचा जाहीरनामाच आपल्या ट्विटर अकाऊंट वरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, जर गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आले, तर गुजरातच्या नागरिकांना ५०० रुपयांत एलपीजी सिलेंडर देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच, ३०० युनीट पर्यंतचे वीजबील मोफत आणि १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही देण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies