Type Here to Get Search Results !

दिवा ते मुंबई व ठाणे लोकल तात्काळ सुरु करा - अमोल केंद्रे


ठाणे, दिवा ता 24 जुलै ( संतोष पडवळ - प्रतिनिधी ) : दिव्यातील समाजसेवक अमोल केंद्रे यांनी 21 मार्च 2023 रोजी एल्गार मोर्चा काढून रेल्वे प्रशासनाने पावसाच्या अगोदर होम प्लेट फॉर्मचे काम पूर्ण करून दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. दिवा स्थानकातील फलाट क्र 5 वरील सौचालय गेल्या वर्षभरापासून अद्यापही सुरु झाले नाही व बंद अवस्थेत आहे. आरक्षण खिडकी संदर्भात वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे. सर्व जलद लोकल दिवा येथे थांबवण्यात याव्यात. सर्व जलद लोकल अगोदरच भरून येत असल्याने काही जलद लोकल कल्याण येथून सोडण्यात याव्यात यावरही अद्याप तोडगा निघाला नाही. दिवा शहरातील नागरिकांची महत्वाची मागणी होती ती म्हणजे दिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल लोकल चालू व्हावी परंतु अजूनही रेल्वे प्रशासन गांभीर्याने घेत नाही.

नागरिकांचे अपघात होवून अनेक बळी जात आहेत. नागरिकांचे जीव वाचवायचे असतील तर वरील समस्या गांभीर्याने सोडवल्या जात नाही. राजकारणापेक्षा दिवा शहरातील नागरिकांचे जीव महत्वाचे आहेत. श्रेय नको नागरिकांना सुविधा द्या त्यांचे जीव वाचले पाहिजेत. त्यामुळे या सर्व समस्या सोडवण्यासाठी धडाकेबाज युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री अमोल धनराज केंद्रे यांनी पुन्हा आज २१ जून 2024 रोजी रेल्वे राज्यमंत्री मा. रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देवून तत्काळ समस्या सोडवून दिवा शहरातील लाखो नागरिकांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies