Type Here to Get Search Results !

कल्याण डोंबिवलीत खाद्यपदार्थांच्या गाड्या.. उघड्यावर गॅस सिलेंडर, कारवाई नाही


डोंबिवली ( शंकर जाधव ) : वर्दळी ठिकाणी उघड्यावर गॅस सिलेंडरचा खाद्यपदार्थ गाड्या करत असल्याची वास्तविकता पालिका प्रशासनाला असूनही दुर्घटना घडल्यानंतर जागे होईल का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.कल्याण येथील पालिकेच्या मुख्यालयातील पालिका आयुक्तांच्या दालनात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत यावर पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला होता.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत खाद्यपदार्थांच्या गाड्या आणि त्यासाठी वापरले जाणारे सिलेंडर हा मुद्दा महत्वाचा बनला आहे. बेकायेशीररित्या सिलेंडर आणि त्याची सुरक्षितता हे विषय समोर आला आहें. यावर कारवाई करणाचे आदेश कल्याण डोंबिवली महानगरालिकेच्या आयुक्त डॉ इंदुरानी जाखड यांनी सहायक पालिका आयुक्तांना दिल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात आयुक्तांच्या आदेशाला गंभीर घेतले जात नसल्याचे दिसते.

खाद्यपदार्थ दुकाने, तिथली सुरक्षितता याबाबत अधिका-याना सूचना देण्यात आल्या असून बेकायदेशीरपणे सिलेंडरचा पुरवठा करणाऱ्या सिलेंडरएजंसीज्वर कारवाईचे आदेश दिले असल्याचे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी सांगितले. मात्र डोंबिवली पूर्व व पश्चिम स्टेशन परिसर, मानपाडा रोड, पेंढरकर कॉलेज परिसर , फडके रोड,९०फीट रोड, या तर कल्याण मध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, दुर्गाडी परिसर, मलंगगड रस्ता, कल्याण मुरबाड रोड व इतर ठिकाणी खाद्यपदार्थांच्या गाड्या , टपऱ्या बिनधास्तपणे सुरू आहेत. गॅस एजंसी चढ्या दराने बेकायदेशीरपणे सिलेंडर दुकानदारांना पुरवत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालिका आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही याची दखल का घेतली जात नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies