डोंबिवली ( शंकर जाधव ) : नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाल्याने देशभर जल्लोष होत असून देश अधिकाधिक विकासाकडे वाटचाल करील असा विश्वास व्यक्त करत डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर, देवीचा पाडा, महाराष्ट्र नगr, गोपीनाथ चौक येथील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत जल्लोष केला.
यावेळी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ सचिव यांनी कार्यालयाबाहेर नागरिकांना पेढे वाटले. नागरिकांही आंनदी होऊन या जल्लोषात सहभागी झाले होते.
यावेळी सचिव राहुल सकपाळ म्हणाले, आज देशातील नागरिकांना आनंद झाला आहे. मोदीजींनी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेतली.