Type Here to Get Search Results !

दिव्यात अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीची धमकी देऊन खंडणी उकळणाऱ्या दुकलीला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

ठाणे : तक्रारदार गणपत म्हात्रे रा.दातीवली ठाणे यांनी इसम नामे गोवर्धन पाटील, रा. डोंबीवली,  ठाणे व त्याचे सहकारी सनी, जितू वाघमारे हे मिळुन ते मुंब्रा देवी परिसरात करीत असलेल्या इमारतीचे बांधकामाविरोधत ठाणे महापालिकेत तक्रार करण्याची धमकी देवुन तकार न करण्यासाठी ५०,०००/- रूपयेची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्याचे धमकीला घाबरून तक्रारदार गणपत म्हात्रे यांनी गोवर्धन पाटील व त्याचे सहकारी यांना २०,०००/- रूपये दिले होते. परंतू गोवर्धन पाटील हा वारंवार उर्वरीत ३०,०००/- रूपयाची मागणी करीत असल्याने


तक्रारदार यांनी पोलीस उप आयुक्त, गुन्हे , ठाणे यांचे कार्यालयात तक्रारी अर्ज दिनांक २८/०६/२०२४ रोजी केला होता. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मालोजी शिंदे यांनी खंडणीची मागणी करणाऱ्या इसमांना खंडणीची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्याचे ठरवून दिनांक ०३/०७/२०२४ रोजी तकारदार गणपत म्हात्रे यांना खंडणी विरोधी पथक कार्यालय येथे बोलावुन घेवुन सापळा कारवाईचे आयोजन करून दिनांक ०३/०७/२०२४ रोजी १३:५० वा दिवा प्रभाग समिती कार्यालयाजवळ, खर्डी गाव, ठाणे येथे तकारदार गणपत म्हात्रे यांचेकडून आरोपी १) गोवर्धन हनुमान पाटील, वय ४१ वर्षे, व्यवसाय '- रिअल इस्टेट एजन्सी, रा. रूम नं. ५०३,

सदगुरू कृपा बिल्डोंग, तलाठी ऑफिस शेजारी, महात्मा गांधी रोड, डोंबीवली प. ठाणे २) गणेश सुसुधाकर शिंपी उर्फ सनी वय ४० वर्ष, व्यवसाय - सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर , रा. १४/१७, विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलनी,गुरु मंदिर रोड, डोंबीवली पुर्व, ठाणे यांना ३०,०००/- रूपये स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरोधात तक्रारदार गणपत म्हात्रे यांचे तक्रारीवरून शिळडायघर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८९३),३०८(४), ३०८५) प्रमाणे दिनांक ०३/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नमुद गुन्हयातील आरोपांना मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींना दिनांक ०९/०७/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदरची  कारवाई पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्‍वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त, गुन्हे श्री शिवराज पाटील, सहायक पोलीस आयुक्त, शोध -२, गुहे शाखा, श्री राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, श्री. शेखर बागडे, व.पो.नि. मालोजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील म.पो.नि.वनिता पाटील,स.पो.नि.श्रीकृष्ण गोरे, सपोनि भुषण कापडणीस, सपोनि सुनील तारमळे, पोउनि विजयकूमार राठोड, सपोउनि सुभाष तावडे, सपोउनि कल्याण ढोकणे, सपोउनि संजय बाबर, पोहवा सचिन शिंपी, पोहवा योगीराज कानडे, पोहवा संदिप भोसले, पोहवा संजय राठोड, मपोहवा शितल पावसकर, मपोशि मयुरी भोसले, पोशि तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, चापोना भगवान हिवरे यांनी केली आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर,बदलापूर परिसरातील रहिवाश्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते कि, अशाप्रकारे कोणी ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर नागरीकांनी त्वरीत खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर येथे तक्रार दाखल करावी. असे आवाहन ठाणे खंडणी विरोधी पथकाकडून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies