नाशिक : नाशिक सायकल संस्थेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यावरणपूरक सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आहे.
वारीचं यंदाचं हे बारावं वर्ष आहे. या वारीत ३०० वारकऱ्यांनी सहभाग घेतला असून, यात ४० महिलांचाही समावेश आहे.. आज पहाटे ही सायकल वारी, नाशिक मधल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, इथून पंढरपूरच्या दिशेनं भक्तीमय वातावरणात मार्गस्थ झाली. या वारकऱ्यांसह जीपमधून भव्य विठ्ठल मूर्तीही पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे.
त्र्यंबकेश्वर इथल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज मंदीरात पूजा आरती केल्यानंतर, ढोल ताशाच्या गजरात माऊलीचा जयघोष करत वारीनं प्रस्थान केलं.या वारीसोबत सर्व वैद्यकीय सुविधा, सायकल दुरुस्ती पथक तसंच एक सहकारी पथक देखील आहे.
या वारीत दिव्यांग सुनील पवारही सहभागी झाले आहेत.