चोवीस तासात कल्याण तालुकात १८९ मी.मी.पावसाची नोंद
डोंबिवली ( शंकर जाधव ) : मंगळवारपासून पडत असलेल्या पावसाने कल्याण डोंबिवली शहरातील नदी,खाडी किनारी तसेच गणेश घाट ,नजीकच्या व सखल भाग आदी ३१ ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते तर सुमारे २४६ कुटुंबाच्या घरात पावसाचे पाणी शिरले. ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले.गेल्या चोवीस तासात कल्याण तालुका मद्ये१८९ मी. मी.पावसाची नोंद झाली.
कल्याण पश्चिमे कडील खाडी किनारी असलेल्या भागांना पावसाचा तडाखा पडला.कल्याण खाडीतील पाण्याची पातळी वाढल्याने खाडीचे पाणी लागत असलेल्या गोविंद वाडी ,रेतीबंदर परिसरातील चाळी मधील घरा मध्ये शिरल्याने या घरातील नागरिकांना त्वरित स्थानिक रहिवाशांनी इतरत्र हलविण्यात आले.गोविंद वाडी परिसरातील तबेल्या मध्ये ही खाडीचे पाणी शिरल्याने तब्ल्यातील म्हशींना गोविंद वाडी दुर्गाडी रस्त्यातील दुभाजकावर बांधून ठेवण्यात आले काळू व उल्हास नदी ने पाण्याची पातळी ओलांडल्याने या दोन्ही नदीच्या किनाऱ्या वर असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
कल्याण स्टेशन परिसर,बाजारपेठ,आंबेडकर रोड, शहाड, आडीवली ढोकलीतसेच खाडी किनारी असलेले अशोक नगर ,वालधुनी ,योगिधाम,घोलप नगर, खडेगोळवली,डोंबिवलीतील पलावा ,कोपर गाव,आयरे गाव,गरिबाचा पाडा ,राजीव नगर,कुंभारखान पाडा, आदी सुमारे ३१ ठिकाणीच्या किनारी असलेल्या २४६ कुटुंबाच्या घरा मध्ये पावसाचे पाणी शिरले असल्याने या घरातील ६४० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थालांतरीत करून सुमारे साडे सहाशे नागरिकांना फूड पाकीट वाटल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
तर शहरात अन्य १९ ठिकाणी पाणी साचल्याची तर आधारवाडी येथे झाड पडल्याची तक्रार पालिकेच्या आपत्कालीन विभागा कडे नोंद करण्यात आली होती. संपूर्ण सिटी पार्कमध्येही पाणी साचले होते.