मॉरीशस : भारताच्या सहकार्यानं मॉरीशसमध्ये सुरु केलेल्या परदेशातील पहिल्या जनौषधी केंद्राचं उदघाटन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या हस्ते करण्यात आलं.
या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत हे जनौषधी केंद्र सुरु केल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे.
भारत आणि मॉरिशस या उभय देशांमधील हा आरोग्य भागीदारी प्रकल्प सार्वजनिक आरोग्य सेवा वाढवण्यासाठी आणि आरोग्य सुधारण्यासाठी किफायतशीर आणि भारतात उत्पादित औषधांचा पुरवठा करेल, असणं जयशंकर यांनी म्हटलं आहे.