Type Here to Get Search Results !

बेकायदेशीर प्रेस स्टिकर व इतर लोगो लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची पत्रकार संघाची मागणी


योग्य ती कारवाई करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांचे आश्वासन

उरण दि ८ ( विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यात बेकायदेशीर प्रेस स्टिकर व इतर शासकीय लोगोचा वापर करणे बेकायदेशीर असतानाही उरण तालुक्यात अनेक छोट्या मोठ्या वाहनांवर वापर केला जात आहे. अशा लोगोचा वापर करून अनेक गैरधंदे केले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यावर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांच्याकडे केली. यावेळी योग्य ती कारवाई करण्याचे संकेत त्यांनी यावेळी पत्रकार संघाला दिले.

उरण तालुक्यात अनेक वाहानावर बोगस पत्रकार प्रेस स्टिकर लावून गैरधंदे करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे पत्रकारांचे नाव मलिन होत आहे. तसेच इतर वाहानांवर महाराष्ट्र शासन, व्हीआयपी, पोलीस इतर नावांच्या लोगो असलेल्या गाड्या फिरतांना दिसत आहे.

भविष्यात यामुळे घातपात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी आपल्या शासकीय पातळीवर अशा बोगस पाटीचा वापर करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघातर्फे करण्यात येत आहे. याविषयी बोलताना उरण पोलिस अधीक्षक यांनी सांगितले की अशा गाड्या लोगो लावून फिरत असतात परंतु ते पत्रकार असल्याचे सांगतात त्यामुळे मग नाईलाजाने त्या गाडीवर कार्यवाही न करता सोडून द्यावे लागते. आपण केलेल्या मागणीचा नक्कीच विचार करून बेकायदेशीर लोगो लावणार्‍या संबंधित गाड्यांवर व सदर व्यक्तीवर कारवाई करण्याचे संकेत दिले.

उरणचा औद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. त्यामुळे अशांपासून भविष्यात धोका संभवत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. उरण परिसरात अनेक चार चाकी आणि दुचाकी गाड्यांवर अशा प्रकारच्या आशयाचे लोगो असलेले स्टिकर लावले जात आहेत. त्यामुळे अनेकदा तपास यंत्रणांना ही चौकशी करतांना काही कारणास्तव आपले हात आखडते घ्यावे लागत आहे. प्रेस स्टिकर्स, शासकीय लोगो उदाहरणार्थ महाराष्ट्र शासन, पोलिस, ज्यांचा या सेवेशी काडी मात्र संबंध नसतो तसेच तो गाडी फिरवणारा ही अज्ञान असताना समोर असलेल्या स्टिकर मुळे तपास यंत्रणांतील अधिकारी वर्ग कारवाई करीत नसल्याचा फायदा उठवीत असतात. अशा बहाद्दरांवर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.

एखाद्याच्या गाडीवर शासकीय लोगो असल्यास त्या गाडीला तपासणे म्हणजे नोकरीवर गदा असते त्यामुळे मग अनेकदा अशा गाड्या न तपासता सोडल्या जात आसतात. याचाच फायदा घेऊन भविष्यात एखाद्या घातपाताची घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पत्रकारांचे अथवा इतर शासकीय लोगोचे नाव खराब होऊ नये यादृष्टीने उरण तालुका मराठी पत्रकार संघाने हे पाऊल उचलत अशा अनधिकृत गाड्यांवर कारवाई व्हावी म्हणून संघाच्या वतीने मागणी करीत तशा प्रकारचे पत्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना दिले.

आपण यावर कायद्याच्या चाकोरीत राहून सबंधितांवर योग्य ती कार्यवाही करू
राजेंद्र कोते पाटील :- वरिष्ठ पोलीस निरीक्षक

 

कारवाई करत असताना सर्व वाहानांची तपासणी करण्यात यावी. यामध्ये जे बोगस सापडतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. - घन:श्याम कडू :- अध्यक्ष, उरण तालुका मराठी पत्रकार संघ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies