Type Here to Get Search Results !

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सिक्युरिटीज ॲपेलेट ट्रायब्युनलच्या नव्या कार्यालयाचं उदघाटन


मुंबई : मुंबईमध्ये सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सिक्युरिटीज ॲपेलेट ट्रायब्युनल अर्थात सॅट च्या नव्या कार्यालयाचं उद्धाटन आज करण्यात आलं. 

भांडवली बाजार विकसित होत असताना या व्यवहारांशी संबंधित विवादांचं निराकरण करण्यासाठी या लवादाच्या अधिक शाखा सुरु व्हायला हव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हा परिसर आधुनिक बनत असल्याबदद्ल सरन्यायाधिशांनी आनंद व्यक्त केला. 

खरंतर तंत्रज्ञान, न्यायालयीन प्रक्रियेचा एक महत्वाचा भाग बनलं आहे, असं ते‍ म्हणाले. गेले एक ते दीडवर्ष अभियान राबवून आपण त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, असं चंद्रचूड यांनी सांगितलं.आपण स्वत:देखील कागद विरहीत कामकाजावर भर देत असून डिजिटल साधनांचा वापर करत आहोत अशी माहिती सरन्यायाधीशांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies