डोंबिवली ( शंकर जाधव ) : 'नागरी बेघरांना निवारा' संदर्भातील राज्यस्तरीय संनियंत्रण समितीने आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस भेट देऊन 'नागरी बेघरांना निवारा' या विषयाशी संबंधित अधिका-यांसमवेत आढावा बैठक घेतली. या विषयाबाबत महापालिका राबवित असलेल्या कार्यप्रणाली बाबत माहिती घेतली.
यावेळी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष उज्वल उके, (से.नि.भा.प्र.से), महेश कांबळे समिती सदस्य, शंकर गोरे सह.आयुक्त न.प.प्र.स., नवी मुंबई , डॉ.रवि जाधव राज्य अभियान व्यवस्थापक नवी मुंबई हे प्रत्यक्ष आणि ब्रिजेश आर्य, प्रमिला जरद हे समिती सदस्य व अनिल उगले उप सचिव न.वि. हे ऑनलाईन प्रणालीव्दारे या आढावा बैठकिस उपस्थित होते.
राज्यस्तरीय सनियंत्रण समितीने यावेळी विचारलेल्या विविध प्रश्नांना विभाग प्रमुख समाज विकास यांनी समर्पक व खुलासेवार माहिती दिल्यामुळे सदर समितीच्या सदस्यांनी या विषयाबाबत महापालिकेच्या सुरु असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सदर समितीच्या सदस्यांनी कल्याण पश्चिमेकडील तात्पुरत्या स्वरुपात उभालेल्या बेघर निवारा केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आणि तेथील लाभार्थ्यांशी संवाद साधला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्गत सुरु असलेले नागरी बेघर निवारा केंद्राबाबत सदर समितीने अत्यंत सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला असून भविष्यात आणखी निवारा केंद्र महापालिका क्षेत्रात उभारणेबाबत सुचना दिल्या.
या समयी महापालिकेचे अति.आयुक्त - 2 धैर्यशील जाधव, विभागप्रमुख (बेघर निवारा) संजय जाधव, सहा.संचालक नगररचना दिशा सावंत, प्र.वैदयकिय आरोग्य अधिकारी डॉ.पुरुषोत्तम टिके, टिकळनगर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन तसेच आरपीएफचे पोलीस अधिकारी,वाहतुक विभागाचे पोलिस अधिकारी, महापालिका उपसचिव किशोर शेळके ,समाज विकास अधिकारी प्रशांत गवाणकर, NULM चे व्यवस्थापक भागवत पठारे, समाज विकास विभागचे इतर अधिकारी/कर्मचारी वर्ग उपस्थित होता.