कोप्रोली ते श्री एकविरा आई मंदिर कार्ला बाईक रॅली उत्साहात संपन्न.
उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील कोप्रोली येथील सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) असे बाईक रॅली काढली जाते व पर्यावरणाचा संरक्षणाचा संदेश देत दरवर्षी श्री एकविरा आई मंदिर कार्ला येथे डोंगर परिसरात वृक्षारोपण केले जाते.यंदा हे रॅलीचे ३ रे वर्ष असून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कार्ला येथे आई एकविरा मंदिर येथे एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण करण्यात आले.
उरण कोप्रोली ते आई एकविरा मंदिर कार्ला अशी बाईक रॅली काढण्यात आली. ४०० हुन अधिक भक्त यात सहभागी झाले होते. कार्लाल्या पोहोचल्यावर एकविरा आईचे दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी एकत्र येत एकविरा देवी मंदिर परीसरात वृक्षारोपण केले .दरवर्षी अशा उपक्रमातून झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देण्यात येतो. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी सदर उपक्रम उत्साहात मोठया प्रतिसादात संपन्न झाला.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरणचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आई एकविरा आईचे भाविक भक्त, ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली.