Type Here to Get Search Results !

अपर पोलीस अधीक्षक महेश तरडे यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मान


ठाणे  : पोलीस सेवेतील उल्लेखनीय कार्याबद्दल ठाणे अँटी करप्शन विभागाचे अपर पोलीस अधीक्षक महेश मोहनराव तरडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. कर्तव्यनिष्ठेने बजावलेल्या अमूल्य सेवेसाठी "गुणवत्तापुर्ण सेवेसाठी हे पोलीस पदक" प्रदान केले जाते. वर्ष २०२४ च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील एकुण ९०८ पोलीसांना पोलीस पदके जाहीर झाली असून त्यात महाराष्ट्रातील ५९ पोलीसांचा समावेश आहे.

मुळचे वाई जि. सातारा येथील असलेले सहायक पोलीस आयुक्त महेश तरडे यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र ठाणे पदावर कार्यरत आहेत.


याठिकाणी केलंय काम...
१९९२ मध्ये ते राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होवुन पोलीस उपनिरीक्षक पदावर भरती झाले. त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळातील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर, भिवंडी, गुन्हे शाखा उल्हासनगर, मुंबई येथे सुरक्षा शाखा, नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा, मिरारोड येथे काशिमीरा विभागात सहायक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असतांना उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

अशी राहिलीय कारकीर्द...
एकुण ३२ वर्षाच्या सेवाकालावधीत त्यांनी कल्याण येथील दिपक शेटटी हत्याकांड, उल्हासनगर येथील शिवसेना कार्यकर्ते गोपाल रजवानी हत्याकांड, अंबरनाथ येथील नगरसेवक प्रसन्न कुलकर्णी हत्याकांड, डोंबिवली येथील केबल व्यावसायिक अनंत पालन हत्याकांड आणि मुंबई येथील हिरे व्यापारी अश्रफ पटेल हत्याकांड अशा अनेक गंभीर मोठ्या गुन्ह्यातील आरोपींना शस्त्रासह अटक करुन क्लिष्ट गुन्हे उघडकिस आणले आहेत. तर खंडणीविरोधी पथकात कार्यरत असतांना सुरेश मंचेकर, छोटा राजन, शेटटी तसेच इतर गँगस्टर टोळयांचे कंबरडे मोडण्याचे काम करताना ११ गँगस्टरना यमसदनी धाडले आहे. विविध गँगच्या ७० खतरनाक गुन्हेगाराना खंडणी घेतांना पकडण्यासह विविध टोळीच्या गुन्हेगारांकडुन देशी-विदेशी बनावटीची ७४ शस्त्रेही त्यांनी हस्तगत केली आहेत.
त्यांच्या या कामगिरीमुळे कल्याण, डोंबिवली ठाणे येथील बिल्डर लॉबी आणि डॉक्टरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. महेश तरडे यांना ३२ वर्षातील उत्कृष्ट सेवेसाठी ५७८ बक्षीसे- प्रशस्तीपत्रे मिळालेली असुन या चांगल्या कामगिरीबद्दल त्यांना सन २०१५ मध्ये "पोलीस महासंचालक" सन्मानचिन्हही प्राप्त झालेले आहे.

तर आता स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महेश तरडे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies