उरण दि २१ (विठ्ठल ममताबादे ) : टीबी मुक्त ग्रामपंचायत अभियान गौरव सोहळा निमित्ताने घारापुरी ग्रामपंचायतीला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दिनांक २१/०८/२०२४ रोजी उरण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात सदरचा सोहळा पार पडला.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वठारकर, आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र इटकरे, डॉ.बाबासो कालेल, सहाय्यक गटविकास अधिकारी, ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर,सदस्यां नीता ठाकुर,हेमाली म्हात्रे,भारती पांचाळ,अरुणा घरत, ग्रामसेवक पवित्र कडु,विकास म्हात्रे आणि आरोग्य विभाग व पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी घारापुरी,पुनाडे,भेंडखळ,वशेणी,सारडे,गोवठणे या ग्रामपंचायतीना टीबी मुक्त ग्रामपंचायत म्हणून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.