ठाणे ( विनोद वास्कर ) : ''एकच वादा आमचा राजू दादा'' असे नागरिक का म्हणतात याचं एक उदाहरण म्हणून या बातमीतून तुम्हाला माहिती देत आहे. १४ गावात असलेल्या पिंपरी मधील संघर्ष महिला बचत गटाने कार्यालय निर्मितीची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांच्याकडे केली होती. ती मागणी आमदार राजू पाटील यांनी पूर्ण केली आहे.
राज्य शासनाकडून महिला बचत गटासाठी विविध योजना ह्या राबवण्यात येत आहेत. मात्र, या योजना महिला पर्यंत न पोहोचता कागदावरच राहत असतात. मात्र, सध्या आमदार राजू पाटील यांच्या कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात महिला बचत गटाच्या संख्येत वाढ झालेली असून त्यांच्या विविध क्षेत्रात काम देखील सुरू आहे. १४ गावात असलेल्या पिंपरी मधील संघर्ष महिला बचत गटाने कार्यालय निर्मितीची मागणी आमदार राजू पाटील यांच्याकडे केली होती. ती मागणी आमदार राजू पाटील यांनी पूर्ण केली. त्यांच्या बचत गटाच्या पुढील भविष्यासाठी स्व:खर्चाने कार्यालय उभारून देण्यात हातभार लावला आहे. काल त्या कार्यालयाचे लोकार्पण आमदार राजू पाटील, महिला बचत गटाच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं आहे.
महिलांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला बचत गटासाठी राबवत असलेली मोहीम आणि त्यांच्या माध्यमातून उत्पादन केल्या जाणाऱ्या उत्पादनाला बाजारपेठ जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी दिले आहे.
यावेळी आमदार राजू पाटील, संघर्ष महिला मंडळ अध्यक्षा निर्मलाताई जाधव, खजिनदार अरुणा संपत जाधव, सचिव कविता जाधव यांच्या संघ अनेक महिला मंडळाच्या सदस्या भगिनी उपस्थित होत्या.