Type Here to Get Search Results !

दुर्गाडी गणेश घाटावरील जाण्याच्या रस्त्यासह इतर सुविधांचे नियोजन करा - शिवसेना माजी नगरसेवक रवी पाटील यांची मागणी


डोंबिवली ( शंकर जाधव ) : गणेशोत्सवात कल्याण मधील दुर्गाडी गणेश घाट परिसरात मोठया संख्येने भक्तगण येत असतात. या ठिकाणची पाहणी मंगळवार 9 तारखेला पालिकेचे अभियंता, शिवसेने कल्याण शहरप्रमुख तथा माजी नगरसेवक रवी पाटील यांनी पाहणी केली. दुर्गाडी गणेश घाटावरील जाण्याच्या रस्त्यासह इतर सुविधांचे नियोजन करा अशी मागणी शिवसेना माजी नगरसेवक रवी पाटील यांनी मागणी केली.

पालिकेचे शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, जगदीश कोरे, स्मार्ट सिटीचे संदीप तांबे, अभियंता सोनवणे, खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे,वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाठ, माजी नगरसेवक अरविंद पोटे, विभागप्रमुख अनंता पगार, उपविभागप्रमुख अजय हिरवे, युवासेना कल्याण शहर प्रमुख पश्चिम सुजित रोकडे, उपशहरप्रमुख अनिरुद्ध पाटील, गटप्रमुख सुनील वाघ, युवासैनिक विनायक भोसले, सोहम बेनकर आदी उपस्थित होते.

दुर्गाडी गणेश घाट परिसरात केडीएमसी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालयाचे काम सुरू आहे. या कामामुळे जाणे येण्यासाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे.

त्यामुळे लवकरच दुसरी मार्गिका सुरू करावी जेणेकरून भाविकांची गैरसोय होणार नाही असे यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितले.शहर अभियंता अनिता परदेशी यांनी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. गणेशोत्सवांपूर्वीच शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्डे भरण्यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येत असून शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्यासाठी आणि नवीन रस्ते बांधणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे माजी नगरसेवक रवी पाटील यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Hollywood Movies