उरण दि १० ( विठ्ठल ममताबादे ) कामगारांच्या न्याय हक्कासाठी रात्रं दिवस लढणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेची घोडदौड दिवसेंदिवस सुरु आहे. कामगारांप्रती असणारी आस्था व कामगारांना न्याय मिळवून देण्याचे कौशल्य यामुळे न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना रायगड व नवीमुंबई मधील कामगारांसाठी आधारस्तंभ बनलेली आहे.अतिरिक्त पाताळगंगा एम.आय.डी.सी.चावणे येथील HPCL व कुंभिवली ता. खालापूर येथील G.A. Steel या दोन कंपन्यातील कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण एकाच दिवशी दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कामगारांना मार्गदर्शन करतांना महेंद्रशेठ घरत म्हणाले की, स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादीत करून हे प्रकल्प उभारले आहेत येथे स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे. जर का व्यवस्थापन मुजोरपणा करून स्थानिक तरुणांना वेठीबिगाऱ्या प्रमाणे वागणूक देत असतील तर आम्ही कदापीही सहन करणार नाही जशास तसे उत्तर देणार असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी पि. के. रमण - (कार्याध्यक्ष - न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना), निखील डवळे - (युवक जिल्हाध्यक्ष), अशोक मुंडे - (सरचिटणीस - रा. जि. कॉं. क), वसंत काठावळे - (मा. उपसभापती), दिनकर देसाई, सिताराम माळी, दिलीप टकले, रजनिकांत माळी, बाळाराम म्हात्रे, संतोष कोंडीलकर, धनाजी कोंडीलकर, मोतीराम कोंडीलकर, विनायक डवळे, किरण सते,NMGKS संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील, लंकेश ठाकूर, आदित्य घरत, आनंद ठाकूर, अरुण म्हात्रे, उत्तम पाटील, चंद्रकांत ठाकूर, राजेंद्र भगत तसेच शेकडोंच्या संखेने कामगार उपस्थित होते.