कल्याण(संजय कांबळे) : देशाचे गूहमंत्री अमित शहा यांनी संसदेमध्ये संविधानावर भाषण करताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल उपहासाने केलेल्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण देशभर होत असताना टिटवाळा मांडा शहरात सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे माझी उपमहापौर बुधाराम सरनौबत यांनी गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी केली.या मोर्चामध्ये सर्व पक्षीय नेते पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत बोलतानाआंबेडकरांचे नाव घेण्याची फँशन झाली आहे, त्या ऐवजी देवाचे नाव घेतले तर स्वर्गात गेले असता असे बोलले त्याचा निषेध करण्यासाठी मांडा टिटवाळा येथील सर्व पक्षीय , विविध संघटना यांच्या वतीने निषेध मोचै काढण्यात आला, वाजपेयी चौक ते बाजार पेठ ते निमकर नाका येथे आल्यानंतर निषेध करण्यात आला, यावेळी अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले, तसेच मयत संतोष देशमुख व सोमनाथ सुर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून दोन मिनिटे श्रंदानजली वाहण्यात आली, त्या नंतर टिटवाळा पोलीस स्टेनशचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांना निवेदन देण्यात आले, त्या मध्ये गूहमंत्री अमित शहा यांनी माफी मागुन राजीनामा द्यावा, तसेच सोमनाथ सुर्य वंशी व सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जास्त जास्त सजा झाली पाहिजे आदि निवेदन देण्यात आले,
यावेळी रिपाइंचे मांडा टिटवाळा शहर अध्यक्ष विजय भोईर यांच्या नेतृत्वाखाली मोचै काढण्यात आला यावेळी रिपाइंचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव,माजी उपमहापौर बुधाराम सरनोबत,रिपाइंचे युवक अध्यक्ष सनी जाधव,,काँग्रेसचे शहर अध्यक्ष राजेश दिक्षीत, शिवसेनेचे उबाठा गटाचे श्रीधर खिसमतराव,ज्ञानेश्वर मढवी, शिवसेना शिंदे गटाचे विजय देशेकर,संभाजी ब्रिगेडनचे प्रभाकर भोईर, मनसेचे बंदिश जाधव,भाजपचे दिपक कांबळे, अमोल केदार,वंचितचे भावेश जाधव,किशोर जाधव,सुभाष पंडित, सुनिल भोईर, विकी जाधव,भारतीय बौद्ध महासभेचे शिलाताई तायडे,रामचंद्र पवार, रेशमा कांबळे ,सपना पवार, शोभा खराट,ज्योती अहिरे,समाजिक कायैकतै विजय तांबे ,जेष्ठ नागरिक कट्टा सुरेश जाधव,समयक संबोधी प्रतिष्ठान डि हि कांबळे, येवले, बौध्दजन पंचायत समिती अनिल येवले,संजय बागडे,,सामाजिक कार्यकर्ते रमेश गायकवाड,रिपाइंचे शरद जाधव,यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.