नवी मुंबई : नवी मुंबईतील पनवेल येथे लिपिकाने न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बोगस सह्या करून वारस दाखले बनवले. या घटनेत लिपिकासह दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत लाखोंचा अपहार झाला आहे.
पनवेल येथील दिवाणी न्यायालयात कार्यरत असणाऱ्या दीपक फड या लिपिकाने चक्क न्यायाधीशांसह न्यायालयातील सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्या आहेत. बोगस सह्या करून त्यावर न्यायालयाचे शिक्के मारून बनावट वारस दाखले तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी दीपक फड याला अटक करून त्याची चौकशी केली असता त्याने पनवेल दिवाणी न्यायालयात दाखल होणाऱ्या वारस दाखल्यांचा चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्या माध्यमातून त्याने लाखो रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वकिल योगेश केळकर आणि अमर पटवर्धन यांना देखील अटक केली आहे. बोगस वारस दाखल्याच्या आरोपीची यादी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.