वक्फ सुधारणा विधेयकासंदर्भात स्थापन झालेली संयुक्त संसदीय समिती आता राज्याच्या प्रतिनिधींची तोंडी साक्ष नोंदवण्यासाठी बैठक घेणार आहे. ही बैठक आज आणि उद्या होणार आहे. आज कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेशच्या राज्य प्रतिनिधींकडून अभिप्राय घेईल. तर उद्या उत्तर प्रदेश, ओदिशा आणि दिल्लीच्या प्रतिनिधींसोबत समिती चर्चा करेल. यापूर्वी समितीनं ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डच्या सदस्यांची बैठक घेतली होती.