ठाणे - दिवा मनसेचे शीळ - देसाई विभाग अध्यक्ष शरद पाटील हे शीळ विभागात आरक्षित भूखंडांवर आणि वनविभागाच्या जमिनींवर होत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाईसाठी सातत्याने महापालिका आणि वन विभागाकडे पाठपुरावा करत असतात. याच रागातून त्यांना काही दिवसांपूर्वी फोन वरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
याबाबतची तक्रार शरद पाटील यांनी डायघर पोलीस स्टेशन येथे केली होती. पण त्यावर योग्य ती कारवाई होत नसल्याने पाटील कुटुंबीय चिंतेत होते. त्याच संदर्भात मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार पाटील यांनी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोइर यांच्या सोबत काल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेतली.
यावेळी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी मनसे कडून करण्यात आली. मनसे नेते आणि माजी आमदार श्री. राजू पाटील यांनीही या संदर्भात पोलीस आयुक्तांशी चर्चा करून कडक कारवाईची मागणी केली.