ठाणे दि. २३, ( विनोद वास्कर ) : आज आगासन गावातील दत्त मंदिर येथे सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांचे आधार कार्ड विलामूल्य, काढून देण्यात आले.
आधार कार्ड अपडेट करणे, आधार कार्ड, श्रम कार्ड व आयुष्यमान कार्ड हे सर्व गावातील नागरिकांना मोफत देण्यात आले. तसेच सुकन्या योजनेचे फॉर्म सुद्धा भरून देण्यात आले. फक्त आधार कार्ड अपडेट साठी फी घेण्यात आली. या शिबिराचा सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.
नागरिकांपर्यंत जास्त जास्त या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी आगरी महिला शक्ती प्रतिष्ठान आगासन दिवा तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. नागरिकांनी चांगलाच प्रतिसाद शिबिराला दिला आहे. अशी माहिती अध्येक्षा उषा मुंडे यांनी दिली आहे.