डोंबिवली ( शंकर जाधव ) : सेवा सहयोग फाउंडेशन यांच्या विद्यमानाने,आयसीआयसी लोम्बर्ड यांच्यामार्फत व रस्ता सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱी यांच्या प्रयत्नातून शाळेत पालक व विद्यार्थी यांना मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी सेवा सहयोग फाउंडेशनचे मॅनेजर विनय बर्वे, रस्ता सुरक्षा समितीचे सुनील पाटील, मंगेश भामरे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मगर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक नारोळे, दोन्ही विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमसाठी उपस्थित होते. पहिल्या टप्प्यातील इयत्ता तिसरी,चौथी व पाचवीच्या साधारण 60 पालकांना व 60 विद्यार्थ्यांना मोफत हेल्मेट वाटण्यात आली. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांनाही हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे.शाळेतील एकूण 200 पालक व विद्यार्थी यांना सेवा सहयोग फाउंडेशन मार्फत मोफत हेल्मेट देण्यात येणार आहेत.
हेल्मेट वापरण्याचे फायदे, रहदारीचे नियमांचे पालन म्हणून पालकांनी व विद्यार्थ्यांनी नियमित हेल्मेट वापरावे असे आवाहन कार्यक्रमाच्या प्रसंगी रस्ता सुरक्षा समितीच्या पदाधिकाऱी यांनी पालकांना व विद्यार्थ्यांना केले.