पुणे : तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.
पुण्यातल्या चित्रपटगृहात ११ पडद्यांवर रसिकांना महोत्सवातले १५० हून अधिक चित्रपट पाहता येतील. शोमॅन राजकपूर यांची १०० वी जयंती ही यंदाची संकल्पना आहे. जागतिक स्पर्धात्मक विभागात निवडलेल्या १४ चित्रपटातून सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट निवडला जाईल.
त्याला महाराष्ट्र शासन संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट हा १० लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.