नवीन वर्षाच्या सुरुवातीस पगारवाढीचा करार !
उरण (विठ्ठल ममताबादे ) : कामगारांसाठी रात्रं दिवस झटणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना मागील कित्तेक वर्षांपासून कामगारांना पगारवाढ व इतर सोई सुविधा मिळवून देण्याची परंपरा कायम राखतांना दिसत आहे. सन २०२४ मधे १५ कंपन्यातील कामगारांना पगारवाढ करून सन २०२५ वर्षाच्या सुरुवातीतच जीटीआय पोर्ट मधील मे. फ्युचर्स स्टफिंग सोल्युशन या कंत्राटाअंतर्गत मेंटेनन्स व ऑपरेटर्स म्हणून काम करणाऱ्या कामगारांना ५००० रुपये पगारवाढ देण्याचा करारनामा करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना किमानवेतन व ५००० रुपये पगारवाढ, बोनस ८.३३%,वॉशिंग अलाऊन्स, रजा तसेच महागाई भत्ता (व्हीडीए ) देण्याचे मान्य करण्यात आले आहे.
सर्वीकडे नवीन कंत्राट मिळविण्यासाठी कमी बजेटमधे निविदा टाकून कामगारांचा विचार न करता कंत्राटदार कंत्राट घेत असतात. त्यामुळे कंत्राटी कामगारांना किमान वेतनात काम करावा लागतो.परंतु कामगार नेते महेंद्र घरत हे आपल्या नेतृत्व कौशल्याने कंपनीला कोणताही नुकसान न करता कामगारांना पगारवाढ व त्यांचे हक्क मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहेत हे त्यांचं वैशिष्ठ आहे.दरवर्षी कामगारांसाठी १५ ते २० पगारवाढीचे करार करणारी एनएमजीकेएस ही एकमेव संघटना आहे.
या करारनाम्या प्रसंगी न्यू मॅरीटाईम अँड जनरत कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष- पि.के. रमण, सरचिटणीस -वैभव पाटील, उपाध्यक्ष -किरीट पाटील, संघटक - अजित ठाकूर, आनंद ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, तर व्यवस्थापनातर्फे हृदयनाथ कांबळे (मॅनेजर HR) कामगार प्रतिनिधी -दिनेश भोईर, पंढरीनाथ म्हात्रे, दिनेश पाटील, आदी उपस्थित होते. झालेल्या पगारवाढीच्या करारनाम्यामुळे कामगारांनी समाधान व्यस्त केला व संघटनेचे आभार मानले.