Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे संघटीत राहणे गरजेचे - शंकर बाईत

पती नसलेल्या स्त्रीयांना धार्मिक कार्यक्रमात सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आवाहन

ठाणे दि. 03: हक्क व अधिकार हे मागून मिळत नाही तर संघटीत पणे लढा द्यावा लागतो. त्यासाठी समाजाने संघटीत राहणे गरजेचे आहे असे विधान कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तालुका शाखा-खेडचे अध्यक्ष शंकर बाईत यांनी केले.

दिवा साऊथ इंडियन इंग्लिश स्कुल येथे कुणबी समाजाचा स्नेह मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी श्री बाईत बोलत होते.यावेळी या कार्यक्रमास कुणबी समाजोन्नती संघाचे संघ कार्यकारणी सदस्य नवनीत पिंपरे, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा खेड ग्रामीणचे सचिव सचिन गोवळकर,सुधीर वैराग,पांडूरंग पाष्टे, मुंबई शाखा खेडचे सुरेश मांडवकर, संदिप दोडेकर,रुपेश तांबट,संजय जाधव,दिनेश मांडवकर, मुंबई कुणबी युवाचे मंगेश मांडवकर, प्रविण शिबे,विलास मुकणाक,शैलेश शिगवण,पंकज तांबट,परशुराम निर्मळ,बबन भागणे, शिवाजी बाईत, जयेश हूमणे तसेच खेड तालुक्यातील मुंबई, ठाणे, दिवाचे कुणबी बांधव व भगिनी दिवा वासीय बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. बाईत म्हणाले की, कुणबी समाज हा बहुसंख्येने असलेला समाज आहे. तो विखुरलेला असल्याने त्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. या स्नेह मेळावाच्या माध्यमातून आपल्या विखुरलेला बांधवांनी संघटित होऊन एकत्र करुन एकजुटीने काम करणे आवश्यक आहे,त्यामध्ये एकमेकांची सुख दुख समजतात, त्यासाठी असे स्नेह मेळावे आयोजित करणे आवश्यक आहे. यातूनच समाजातील प्रश्नांवर विचारविनिमय करता येतो.कुणबी समाजाला जातीचा दाखला मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या त्या अडचणी कुणबी समाजोन्नती संघाच्या माध्यमातून सोडवण्यात आल्या आहे. असे ही यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री. सचिन गोवळकर म्हणाले की, पती नसलेल्या स्त्रियांना हळदीकुंकू कार्यक्रमासह इतर सर्वच धार्मिक कार्यक्रमात डावलले जाते. पती मयत होणे यामध्ये स्त्रीचा काहीच दोष नाही. अशा स्त्रियांना समाजाची खरी गरज आहे. त्या स्त्रीयांना सन्मानपूर्वक धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्या. भेदभाव करु नका ? "नवरा असणे" हाच केंदबिंदू मानून बाईचं मूल्यमापन करणार का ? खरंतर जास्तीत भावनीक मदत समाजात एकटे पडलेल्या स्त्रियांना असते. समाज बांधवांनी भगिनीनी यावर विचार करायला हवा. जेव्हा पुरुष अर्ध्यावर संसार टाकून जातो, तेव्हा अपमानीत न करता सन्मानपूर्वक सणांमध्ये सहभागी करुन घेणे गरजेचे आहे.

तसेच कुणबी समाजातील जमनीच्या कुळाचे प्रश्न, जातीचे दाखले व जातनिहाय जनगणना या बदल मार्गदर्शन केले.

यावेळी नवनीत पिंपरे,सुधीर वैराग,मंगेश मांडवकर,यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमांची प्रस्ताविक सुरेश मांडवकर सुत्र संचालन राजेश मेटकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad

Design by - Blogger Templates |