डोंबिवली ( शंकर जाधव ) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेने 'थुंकणे-मुक्त रस्ते आणि टीबी मुक्त डोंबिवली'मोहीम राबविले. शिवसेना डोंबिवली शहर सचिव तथा डोंबिवली विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष चव्हाण, माजी नगरसेवक रवी पाटील, गजानन व्यापारी, वैभव राणे, सुदाम जाधव यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यावर थुंकण्यास प्रशासनाकडून दांडात्मक कारवाई जरी होत असली तरी नागरिकांनी स्वतःहून स्वच्छ शहर ठेवावे याकरिता प्रयत्न सुरु आहे.
एकीकडे जनजागृती होत असताना दुसरीकडे शिवसेनेने रिक्षाचालकांना रस्त्यावर थुंकू नका अशी विनंती केली.