Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

‘वेव्हज्’मध्ये शुक्रवारी जागतिक माध्यम संवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी


मुंबई, दि. ०१: वेव्हज् 2025 या आंतरराष्ट्रीय मनोरंजन परिषदेचे आयोजन जिओ वर्ल्ड सेंटर, बीकेसी मुंबई येथे १ ते ४ मे २०२५ दरम्यान करण्यात आले आहे. या परिषदेत उद्या 2 मे 2025 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे.

दालन क्रमांक 105 ए अण्ड बी, दालन क्रमांक 104 ए आणि 103, क्युब ॲण्ड स्टुडिओ येथे वेव्हज् बाजार असणार आहे. वेव्हज बझार हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठीची प्रमुख जागतिक बाजारपेठ असून, ते चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदार, विक्रेते आणि विविध प्रकल्प आणि प्रोफाइलशी जोडून घेण्याची संधी देईल. व्ह्यूईंग रूम हे वेव्हज् बझारमध्ये उभारलेले एक समर्पित व्यासपीठ असून, ते 1 ते 4 मे 2025 या काळात खुले राहील.

तसेच लोटस-1 येथे जागतिक माध्यम संवाद आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जागतिक धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील भागधारक, मीडिया व्यावसायिक आणि कलाकार एकत्र येतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यतांत्रिक नवोन्मेष आणि नैतिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करून दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्य घडवण्याच्या उद्देशाने रचनात्मक चर्चेत सहभागी होतील. तसेच दु. 2.30 जास्मीन हॉल क्र.1 येथे क्रिएट इंडिया चँलेज पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

परिषदेत प्लेनरी सत्रामध्ये जस्मीन हॉल क्र.1 येथे स. 10 ते दुपारी 2 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, सादरीकरण आणि परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तर जास्मीन हॉल क्र.2 येथे स 10 ते सायंकाळी 6 दरम्यान विविध विषयांच्या पॅनलवरील चर्चासत्रे, संवाद सत्र, फायर साईट चॅट उपक्रम होणार आहे. तसेच जास्मीन हॉल क्र.3 येथे स 10 ते सायंकाळी 6 पर्यंत विविध विषयांच्या पॅनलवरची चर्चासत्रे, परिसंवाद, फायर साईट चॅट होणार आहे.

या परिषदेत ब्रेकऑउट सत्रात दालन क्रमांक 202, 203, 205, 206 मध्ये स 9.30 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चित्रपट माध्यम क्षेत्राचे विविध तंत्रज्ञान, नवीन आव्हाने, नव्या संधी याविषयी चर्चासत्रे होणार आहेत. परिषदेत मास्टर क्लास सत्रात सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत दालन क्रमांक 204 ए मध्ये विविध मनोरंजन क्षेत्राविषयी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वेव्ह एक्स या सत्रामध्ये सकाळी 10 ते दुपारी 3.30 दरम्यान दालन क्रमांक 104 बी येथे विविध कार्यक्रम होणार आहेत.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |