उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते तीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण
ठाणे – महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे येथील पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे गुरुवार, दि ०१ मे, २०२५ रोजी सकाळी ८ वाजता प्रमुख शासकीय समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व विविध उपक्रम पार पडले.
या समारंभात जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत आरोग्य विभागाच्या मोबाईल मेडिकल युनिटने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल मेडिकल युनिटच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याशिवाय, आरोग्य सेवा सशक्त करण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाच्या तीन नव्या रुग्णवाहिकांचे उद्घाटनही करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा, प्राथमिक आरोग्य केंद्र वज्रेश्वरी, प्राथमिक आरोग्य केंद्र धसई या प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमांतर्गत पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा देखील येथे सन्मान करण्यात आला. ‘NQAS certified PHC’ च्या वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचा सत्कार देखील करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी.एस.स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पंजाबराव उगले, संजय जाधव, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ.श्रीकांत परोपकारी, शशिकांत बोराटे, सुभाष बुरसे, डॉ.मोहन दहीकर, अमरसिंह जाधव, प्रशांत कदम, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, प्र.उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) सचिन चौधर, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, उमेदच्या प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख बाबासाहेब रेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बालविकास) संजय बागुल, सार्वजनिक बांधकाम विभाग (विद्युत) कार्यकारी अभियंता संजय पुजारी, जिल्हा परिषद उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, ममता डिसूझा, तहसिलदार संजय भोसले, उमेश पाटील, रेवण लेंभे, डॉ.आसावरी संसारे, प्रदीप कुडाळ, उज्वला भगत, नायब तहसिलदार राहुल सूर्यवंशी, विठ्ठल दळवी, स्मितल यादव, जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.