Type Here to Get Search Results !

moblie menu

BREAKING NEWS

पारोळा केंद्रात उत्साह पूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा




नूतन केंद्रप्रमुख रामकृष्ण आर बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली नाविन्यपूर्ण उपक्रम

पारोळा : सोमवारी तारखेला उन्हाळी सुट्टीनंतर जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्या . नेहमीप्रमाणे पारोळा केंद्र समुहातील शाळांनी नूतन केंद्र प्रमुख रामकृष्ण आर बाविस्कर यांच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनातून नाविन्यपूर्ण विद्यार्थी हिताचे उपक्रम साजरा करून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात शाळा प्रवेशोत्सव साजरा केला . सर्व शाळांनी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्यात पहिल्या दिवशी शाळेबाबत गोडी निर्माण होईल असा प्रयत्न केला . जि प उच्च प्राथमिक शाळा उर्दू बॉईज येथे नूतन इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आकर्षक डिजिटल कंपास बॉक्स वाटप करण्यात आले .

जि प उच्च प्राथमिक उर्दू कन्या शाळा पारोळा येथे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनींच्या डोक्यावर आकर्षक मुकुट परिधान करून त्यांना वही पेन देऊन त्यांचे विशेष शिक्षिका वर्षा पाटील यांच्या हस्ते स्वागत केले . जि प प्राथमिक शाळा बॉईज क्रमांक ३ येथे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले . विशेष म्हणजे तीन इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला .

जि प प्राथमीक शाळा बोदर्डे येथे सुंदर अशा सजीवलेल्या ट्रॅक्टर मधून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात येऊन गावात शैक्षणिक व उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यात आले . जि प उच्च प्राथमिक शाळा विचखेडे येथे अगोदर सरस्वती पूजन करून नूतन केंद्रप्रमुख रामकृष्ण आर बाविस्कर यांचे स्वागत करण्यात आले . त्यावेळी नावागत बालकांची ढोल ताशाच्या गजरात गावात मिरवणूक काढण्यात आली . जि प उच्च प्राथमिक शाळा क्रमांक २ पारोळा येथे अतिशय नाविन्यपूर्ण वातावरणाची निर्मिती करून नवागतांचे स्वागत नगरपरिषद पारोळा मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या नावाची आकर्षक रांगोळी रेखाटून सर्वांचे लक्ष आकर्षित केले . शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती मयुरी पाटील यांनी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना आकर्षक बॉक्स , पेन्सिल , शॉपनर ' खोडरबर व दप्तर वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगुणित केला .

उच्च प्राथमिक शाळा शेवगे बु॥ येथे अतिशय उत्साहात नवागतांचे स्वागत शाळा शिक्षक व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी डॉ श्रवण रोहित शेठ यांच्या कडून शाळेच्या सर्व विदयार्थ्यांना आकर्षक सुंदर टिकावु दप्तर वाटप करण्यात आले . नवे दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलुन गेले होते .

अशा पद्धतीने केंद्रातील सर्वच शाळांनी मोफत पाठ्यपुस्तके , गणवेश व बूट मोजे वाटप करून विद्यार्थ्यांचा आनंद वृद्धिंगत करून प्रवेशोत्सव साजरा केला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Below Post Ad


Design by - Blogger Templates |