कल्याण (संजय कांबळे) : देशात पंतप्रधान नेतृत्वाखाली टीबी मुक्त भारत हे अभियान पूर्ण देश भर राभवण्यात येत आहे. २०२५ चे आखिरेच क्षयरोगाचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य आहे. ह्या अभियाना अंतर्गत शासनाकडून विविध उपायोजना राबवल्या जातात व त्यातील निक्षय पोषण आहार ही प्रमुख योजना राबवली जाते. ह्या योजनेअंतर्गत आज कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे येथील ८० रुग्णांना आमदार सहा महिन्याचे पोषण आहार वाटप करण्यात येणार आहे. ह्या उपक्रमामुळे क्षय रुग्णांना चांगल्या औषध उपचारा सोबत सकस आहार सुद्धा मिळणार आहे.
यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ पूनम जयकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
क्षयरुग्णांना उपचारावेळी पोषण आहार मिळाला नाही तर उपचाराचे सकारात्मक परिणाम दिसत नाही त्यामुळे क्षय रुग्णांना पोषण आहार देण्यासाठी राबवलेल्या निक्षय मित्र उपक्रमांतर्गत कल्याण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र निळजे येथे आमदार राजेश मोरे यांनी 'निक्षय मित्र, म्हणून कार्यक्षेत्रातील ८० क्षयरुग्णांना निक्षय पोषणआहार वाटप केला आहे क्षयरुग्णांसाठी बनवलेल्या फूड बास्केटमध्ये तांदूळ, डाळी, मटकी, खाद्यतेल, शेंगदाणे ,याचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी आमदार श्री मोरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास पत्र्याचे शेड दिल्याबद्दल त्यांचे डॉ जयकर यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार राजेश मोरे म्हणाले, निळजे प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपजिल्हा रुग्णालय झाले तर अधिक लोकांना आरोग्य सेवा देता येईल, याचा प्रस्ताव पाठवा तो मंजुरीसाठी प्रयत्न करतो असे सांगून टिबी आटोक्यात यायला हवे असे बोलून जर पेशंट वाढले तरी त्यांना सर्वांना सामावून घेतले जाईल असे बोलून सर्वांना पोषण आहार कायमस्वरूपी मिळेल असे ही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ,पूनम जयकर मॅडम,जिल्हा क्षयरोग कार्यालय मधून डॉ,चारुलता धानके विस्तार अधिकारी मोहन गायकवाड, निळजे पीएससीचे डॉ गोविंद उपाध्याय, समुदाय आरोग्य अधिकारी अक्शेना कोरे,धनंजय भदाणे,कैलास घरत, पूजा चव्हाण, विनोद पवार, माने, चौधरी,प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी , सामुदाय आरोग्य अधिकारी , आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक ,आरोग्य सेविका ,औषध निर्माण अधिकारी, वैज्ञानिक प्रयोगशाळा अधिकारी तसेच गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.